कॅण्टीनअभावी पवई आयआयटीतील विद्यार्थ्यांची गैरसोय

254

पवई येथील आयआयटी मुंबईच्या आवारातील 15 पैकी 6 कॅण्टीन बंद करण्यात आल्याने हजारो विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. खाद्यपदार्थांचा खालावलेला दर्जा, बांधकामामध्ये बदल करण्यासाठी प्रशासनाने केलेल्या सूचना, कंत्राट रद्द होणे अशा कारणांमुळे कॅण्टीन बंद करण्यात आल्याचे सांगितले जाते. परंतु पर्यायी व्यवस्था न केल्यामुळे विद्यार्थ्यांना मात्र पोट भरण्यासाठी आवाराच्या बाहेर जाण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही.

गेल्या मार्च महिन्यात आयआयटी मुंबईतील विद्यार्थिनींच्या वसतिगृहामधील कॅण्टीनमध्ये अनेकांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर संस्थेच्या हायजिन समितीने सर्व कॅण्टीन्सची पाहणी केली. खाद्यपदार्थांचा दर्जा चांगला नसल्याचे समितीला आढळल्यानंतर चार कॅण्टीन बंद करण्यात आल्या अशी माहिती आयआयटी मुंबईच्या ‘इनसाइट’ या नियतकालिकामध्ये देण्यात आली आहे. ‘इनसाइट’मध्ये विद्यार्थ्यांनी आयआयटीमधील गैरसोयींचा पाढा वाचला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या