विजय शंकरला ‘विराट’ साथ, टीकाकारांना सडेतोड उत्तर

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या संघात अष्टपैलू खेळाडू विजय शंकरला स्थान देण्यात आले आहे. नंबर चार साठी विजयची निवड झाल्यानंतर क्रीडा वर्तुळातून समिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. रायडूला टाळून शंकरवर डाव खेळण्यात आल्याने टीकाकारांनी निवड समितीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. परंतु आता विजय शंकरच्या बचावासाठी कर्णधार विराट कोहली मैदानात उतरला आहे.

#WorldCup2019 अखेर ऋषभ पंत, अंबाती रायडूला संघात स्थान मिळाले पण…

कोहलीने टीकाकारांना सडेतोड उत्तर देताना निवड समिती आणि शंकरच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला आहे. विश्वचषकाचा संघ निवडण्यापूर्वी नंबर चारसाठी अनेक खेळाडू रेसमध्ये होते. आम्ही अनेक खेळाडूंवर डाव खेळून पाहिला. अनेक प्रयोगही करून पाहिले. अखेर फलंदाजी, गोलंदाजी आणि उत्तम क्षेत्ररक्षण करू शकणारा शंकर संघात आला. तो एक उत्कृष्ट फलंदाज आहे. त्यामुळे आम्हाला आणखी एक पर्याय मिळाला. सर्वच शंकरच्या नावावर सहमत असल्याने आम्ही तो निर्णय घेतला असेही विराट म्हणाला.

अखेर रायडू सोशल मीडियावर व्यक्त झाला, शंकरच्या निवडीवरून निवड समितीला टोला

धोनी कोणत्या क्रमांकवर खेळणार?
डेथ ओव्हरमध्ये धोनी गेल्या काही काळापासून चाचपडताना दिसत आहे. रोहित शर्माने धोनीला वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी बोलावण्याची शिफारस केली होती. परंतु विराटने मात्र धोनी पाचव्या क्रमांकावर योग्य असल्याचे म्हटले आहे.