
वाशीम जिल्ह्याहून पूण्याला जाणारी महिंद्रा गाडी आज पहाटेच्या दरम्यान सुलतानपूर जवळील पुलावरून खाली पाण्यात जाऊन कोसळली. या अपघातात दोन ठार तर दोन जखमी झाले आहेत.
हा अपघात आज पहाटे दोन नंतर झाल्याचा अंदाज आहे. वाशीम येथून महिंद्रा एस यु व्ही गाडी क्रमांक MH 32 AH 4369 ही पूणे जातांना सुलतानपूर जवळील सीता न्हाणी नदीवरील पुलाचे कठडे तोडून ही गाडी पुलाखाली पाण्यात कोसळकी त्यात दोन जण ठार झाले तर दोन जण जखमी झाले आहेत.
योगेश दत्ता अंभोरे(30),अजय शंकर इंगोले(32)अशी मृतांची नावे आहेत. तर जखमीची नावे गणेश रमेश वाघ (28) व ऋषीकेश दत्तात्रय आदमाने (27 ,सर्व रा.वाशीम) आहेत. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

























































