
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा टॅप रस्त्यावर सिंधुदुर्गहून रत्नागिरीकडे येणाऱ्या कारचा अपघात झाला. हा अपघात दुपारच्या सुमाराला झाला. मार्गफलक न दिसल्याने कारने अचानक रस्त्यावरील कठडय़ाला धडक दिली आणि गाडी रस्त्यावर उलटली आणि काही क्षणातच गाडीने पेट घेतला. डॉ. मिहीर प्रभुदेसाई (39) हे गाडीने रत्नागिरीत येत होते. हातखंबा-पाली परिसरात रस्त्यावर सुरू असलेल्या कामामुळे मार्गात बदल करण्यात आला आहे. मात्र, चालकाला रस्त्यावरील मार्ग बदलाचा सूचना देणारा फलक दिसला नाही. यामुळे ताबा सुटला आणि भरधाव वेगातील गाडी थेट समोर असलेल्या दगडाच्या कठडय़ावर जोरदार आदळली त्यानंतर गाडी पलटी झाली आणि काही क्षणातच गाडीने पेट घेतला. यात डॉ. मिहिर जखमी झाले तर त्यांची मुलगी किरकोळ जखमी झाली.
























































