श्रीरामपूर रस्त्याजवळ कार मोटरसायकलला धडकली; एका महिलेचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शहरालगत ढुस वस्ती जवळील अग्नि मंदिरासमोर श्रीरामपूर रस्त्यावर कारचे टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर राहुरीच्या दिशेने येणाऱ्या मोटारसायकलवर कार धडकली. या भीषण अपघातात मायलेक गंभीर जखमी झाले. उपचारासाठी नेत असताना महिलेचा मृत्यू झाला. मुलाची प्रकृती गंभीर असून त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीरामपूर राहुरी फॅक्टरी रस्त्यावर देवळाली प्रवरा शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर बुधवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारस इंडिगो कार आणि दुचाकीचा अपघात झाला. कारचे टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार दुचाकीला धडकली. दुचाकीवरील मायलेक रस्त्यावरुन तीस फुट शेतात फेकले गेले. या अपघातात अभिजित पोपट वाघमारे (वय.16) गंभीर जखमी आहे. तर गिता पोपट वाघमारे (वय 45 दोघे रा. कोंची मांची तालुका संगमनेर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.