किमती वाढल्या म्हणून वाहन खरेदी घटली, मारुती सुझुकीच्या अध्यक्षांचे मत

549

देशातील सुमार बँकिंग व्यवस्था, सेफ्टी फिचर्स जोडल्यामुळे वाहनांच्या वाढलेल्या किमती त्यातच पेट्रोलडिझेलवरील वाढलेला टॅक्स, नोंदणी शुल्क यामुळे वाहन खरेदी ग्राहकांच्या हाताबाहेर गेल्याचे मत मारुती सुझुकी कंपनीचे अध्यक्ष आर.सी.भार्गव यांनी व्यक्त केले.

देशात वाहन खरेदीच्या टक्केवारीने कधी नव्हे तो निच्चांक गाठला आहे. यासाठी राज्य सरकारही जबाबदार असल्याचे भार्गव यांनी स्पष्ट केले. वाहन खरेदीत 50 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. दुचाकी चालविणार्‍या ग्राहकाला चारचाकी वाहन चालविण्याची इच्छा आहे, पण पैशांच्या चणचणीमुळे ग्राहक वाहन खरेदी करू शकत नाही. ओलाउबेरमुळे वाहन खरेदी कमी होत आहे हे चुकीचे असल्याचे स्पष्ट करून वाहनांमध्ये बसविण्यात आलेले महागडे सेफ्टी फिचर्स, विमा पॉलिसीच्या रकमेत झालेली वाढ, सुमारे 9 राज्यांतील अतिरिक्त टॅक्स यामुळे वाहन खरेदीचा कल कमी झाल्याचे भार्गव यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले.

पेट्रोलडिझेलच्या वाढणार्‍या किमतीबरोबरच राज्य सरकारने रस्ते आणि नोंदणी शुल्कातही वाढ केल्याने वाहन खरेदी कमी होताना दिसत आहे.  आर.सी. भार्गव, संचालक, मारुती सुझुकी

आपली प्रतिक्रिया द्या