
उन्हाळय़ात गॉगल खरेदी करताना काळजी घ्या. नाहीतर डोळय़ांचे नुकसान होऊ शकते. उन्हाळय़ात जर खरोखर डोळय़ांचं संरक्षण करायचं असेल तर असे स्वस्तातले गॉगल टाळावे. दुकानात गॉगल घेताना त्या गॉगलची फक्त स्टाईल बघू नका.
डोळय़ांना शांत वाटेल असे गॉगल्स खरेदी करा. उन्हाळय़ाच्या दिवसांत पिवळसर छटा असणारे गॉगल घेण्यापेक्षा काळपट, निळसर काचा असणारे गॉगल खरेदी करणं जास्त चांगलं. खूप लहान आकाराचे गॉगल घेऊ नका.



























































