करिअर : उत्तम संकलक व्हा!

>>प्रतिनिधी

वाढत्या दूरचित्रवाहिन्या आणि मनोरंजनाच्या साधनांमुळे व्हिडीयो एडिटरला मागणी आहे. यामध्ये तरुणांना पैशाची उत्तम आवकच नाही, तर करीयरमध्ये वेगळय़ा उंचीवर पोहोचण्यासाठी मदत होऊ शकते.

आजच्या धावपळीच्या युगात इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि करमणुकीची  विविध माध्यमे वेगाने वाढत आहेत. यामुळे ‘व्हिडीयो एडिटिंग’ हा करीयरचा एक उत्तम पर्याय या क्षेत्राची आवड असणाऱ्यांकरिता उपलब्ध झालेला आहे.

अनेक चित्रफितींची एकच चित्रफीत करणे म्हणजे एडिटिंग. सध्या व्हिडीयो एडिटिंगशिवाय कार्यक्रम पूर्ण होत नाही. आवाज आणि चित्रीकरणाचे संपादन हे व्हिडीयो एडिटरचे प्रमुख काम. मालिका, सिनेमा, संकेतस्थळे , मल्टिमीडिया कंपनी, व्हिडीयो एडिटिंग स्टुडियो किंवा जाहिरात एजन्सी, म्युझिक वर्ल्ड, बीपीओ अशा अनेक क्षेत्रांत व्हिडीयो एडिटरला काम करण्याची संधी मिळते. व्हिडीयो स्ट्रिमिंग, मूव्ही क्लिपिंग अशा नव्या तंत्रामुळे व्हिडीयो संपादनातील करीयर महत्त्वपूर्ण ठरत आहे.

संस्था

> फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया, पुणे.

> आयआयएमसी, जेएनयू न्यू कॅम्पस, नवी दिल्ली.

> व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल, मुंबई

> सत्यजीत रे फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट, कोलकाता.

> इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ जर्नलिझम, बंगळुरू.

 अभ्यासक्रम

> १२ वी नंतर व्हिडीयो एडिटिंग कोर्ससाठी प्रवेश घेता येतो. या क्षेत्रात पदवी, डिप्लोमा तसेच शॉर्ट-टर्म कोर्सही उपलब्ध आहेत.

> सहा महिने किंवा दोन वर्षांचे सर्टिफिकेट कोर्सही करता येतात.

> एखाद्या वाहिनीवर नोकरी करण्याची इच्छा असल्यास ग्रॅज्युएशन  आवश्यक आहे. बऱ्याच संस्थांमार्फत हा कोर्स शिकवला जातो. कोर्सनंतर प्लेसमेंटमध्ये नोकरी करण्याची संधीही दिली जाते. प्रत्येक संस्थेतील फी वेगवेगळी असते.

> या अभ्यासक्रमात पीएच.डी. केल्यानंतर मीडिया इन्स्टिटय़ूटमध्ये प्राध्यापकाची नोकरीही करता येऊ शकते.

आपली प्रतिक्रिया द्या