फिटनेस म्हणजे आत्मविश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>प्रशांत मोरे, कॅरमपटू

> फिटनेस म्हणजे? ः फिटनेस आयुष्यातला महत्त्वाचा भाग. आपल्या शरीरामध्ये जास्त चरबी असेल तर मेंदू मंदावतो. फिटनेस नेटका असेल तर आरोग्यासोबतच आत्मविश्वास वाढतो. शरीराबरोबर  मानसिक आरोग्यही तेवढेच महत्त्वाचे आहे.

> खेळ की आरोग्य? ः कॅरम खेळण्यासाठी जसं सोंगटय़ा, स्ट्राईकरची गरज असते, त्याचप्रमाणे या खेळासाठी आरोग्यही महत्त्वाचे आहे. कॅरमसाठी स्वतःवरचा आत्मविश्वास आणि एकाग्रताही खूप लागते. त्यासाठी आपले आरोग्य निरोगी असणे तेवढेच महत्त्वाचे असते.

> डाएट की जीवनशैली? ः जीवनशैलीला प्राधान्य देईन. आपण आपल्या आयुष्यात जीवनशैलीला जेवढे महत्त्व देऊ, तेवढे आयुष्यासाठी फायदेशीर आहे. डाएट हा स्वतःहून आपण सुधारतो.

> खेळ म्हणजे दिसणं, आरोग्य की स्पर्धा? ः कॅरमकडे जास्तीत जास्त लक्ष दिले की, स्पर्धात्मक जगात उत्तम यश मिळते आणि आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले असेल तर नक्कीच आपण चांगले दिसायला लागतो. कारण यशामुळे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो.

> व्यायामाला किती वेळ देता? ः व्यायाम मी माझ्या खेळासाठी करतो. व्यायामापेक्षा योगा माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्यायामापेक्षा योगाला मी जास्त प्राधान्य देतो.

> जिमला जायला मिळालं नाही तर? ः जिमला मी फक्त कार्डिओ करतो. पण जिमला जायला मिळालं नाही तर मी माझ्या घरातच किंवा ग्राऊंडमध्ये व्यायाम करतो.

> दिवसातून किती पाणी प्यावे? ः दिवसातून कमीत कमी पाच लिटर पाणी आपल्या पोटात जायला हवे. मी कॅरम खेळताना एका मॅचला तीन लिटर पाणी पितो.

> कोणते पदार्थ नियमित खाता? ः फळभाज्या, फळांचे रस, अंडी, ताक.

> फिटनेससाठी कसला त्याग केलाय? ः  भात आणि चीज.

> फिटनेसबाबत अपडेट करण्यासाठी? ः स्वतःचे वेळापत्रक तयार केलंय. ते फॉलो करून अपडेट राहतो.

> फिटनेस मंत्र ः आहारावर नियंत्रण ठेवणे, वेळेवर झोपणे, लवकर उठणे  हे नियमित करतो. पहाटे सातनंतर आपल्या शरीरामध्ये अनावश्यक चरबी तयार होते.