
ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरवर सिडनीतील मारूब्रा येथे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्या या बेदरकार कृत्यामुळे त्याचे लीग क्रिकेट अडचणीत आले आहे.
न्यू साउथ वेल्स पोलिसांनी रँडम ब्रेथ टेस्टदरम्यान वॉर्नरची गाडी अडवली. तपासाआधीच गाडी थांबवून पार्प करण्याचा प्रयत्न केल्याने वॉर्नरवर संशय निर्माण झाला होता. रस्त्यावरील चाचणीत तो पॉझिटिव्ह आढळला, तर पोलीस ठाण्यातील तपासात त्याच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण 0.104 नोंदले गेले. हे प्रमाणच कायदेशीर मर्यादेपेक्षा दुप्पट आहे. त्यानंतर त्याला अटक करून मारूब्रा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. 7 मे 2026 रोजी डाउनिंग सेंटर स्थानिक न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.






























































