
महानगरपालिका निवडणूक काळात होणाऱ्या पैशांच्या देवाणघेवाणीवर भरारी पथकांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडून करडी नजर ठेवण्यात आली आहे. मुंबईतील देवनार परिसरात निवडणूक पथकाने मोठी कारवाई करत दोन व्हॅनमधून तब्बल 2 कोटी 33 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. या प्रकरणी आयकर विभागाकडून अधिक तपास करण्यात येत आहे. ही रोकड एटीएममध्ये भरण्यासाठी नेली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. सध्या ही रोकड देवनार पोलिसांकडे कस्टडी म्हणून ठेवण्यात आला आहे.































































