खासदार डॉ. जयसिद्धेश्वर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश

927

बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अहवाल सादर करण्याचा आदेश सोलापूर जिल्हा न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी के. पी. जैन यांनी दिला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र जातपडताळणी समितीने रद्द केले आहे. यावेळी समितीने खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याविरुद्ध अक्कलकोटच्या तहसीलदारांना गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता. या पार्श्वभूमीवर अक्कलकोटचे तहसीलदार शिरसट यांनी सोलापूर जिल्हा न्यायालयातील न्यायदंडाधिकाऱयांसमोर फिर्याद दाखल केली होती. बुधवारी मुख्य न्यायदंडाधिकारी के. पी. जैन यांच्यासमोर तहसीलदार शिरसट यांनी दिलेली फिर्याद व सरकारी पक्षाचा युक्तिवाद झाला. न्यायदंडाधिकाऱयांनी डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून न्यायालयास अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.

आपली प्रतिक्रिया द्या