
जातीव्यवस्था संपवा, आम्ही आरक्षण सोडायला तयार आहोत, असे विधान सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केले. जातीच्या आधारावर आरक्षण देण्यासाठी जनगणना ही जातीनिहायच व्हायला हवी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना आठवले यांनी आरक्षण हे आर्थिक निकषावर नको, तर जातीच्या आधारावरच मिळायला हवे, असे म्हटले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे. त्याला आमचा पाठिंबाच आहे. त्याला ओबीसी प्रवर्गाऐवजी स्वतंत्र आरक्षण द्यायला हवे. आरक्षणासाठी आर्थिक निकष लावणे मात्र चुकीचे आहे, असे आठवले म्हणाले.
































































