
सामना प्रतिनिधी, पुणे
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्ये प्रकरणी बेकायदा प्रतिबंधक हालचालीचे कलम (यूएपीए)मध्ये वाढ करण्यासाठी सीबीआयने न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यासाठीदेखील सीबीआयने न्यायालयाकडे मुदतवाढीची मागणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम.ए. सय्यद यांच्या न्यायालयात अर्जाद्वारे केली.
20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. दाभोलकर यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सुरुवातीला मनीष नागोरी आणि खंडेलवाल या दोघांना अटक करण्यात आली होती. मात्र या गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न न झाल्याने त्यांच्या विरोधात आरोपपत्रही दाखल झाले नाही. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. सीबीआयने सनातनचा साधक डॉ. विरेंद्रसिंह तावडे याला अटक करून आरोपपत्र दाखल केले होते.
summary- cbi demands more time for investigation of dr dabholkar murder




























































