
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या मान्यतेनंतर सीबीआयचे संचालक प्रवीण सूद यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. सूद यांची 25 मे 2023 रोजी संचालकपदी निवड करण्यात आली होती. त्यांचा दोन वर्षांचा कालावधी या महिन्यात संपुष्टात येणार होता. सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा समावेश असलेल्या निवड समितीने सूद यांचा कार्यकाळ वाढविण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना 24 मेनंतर एक वर्षासाठी मुदतवाढ दिली जाईल.