
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याविरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. जम्मू-काश्मीरमधील किश्तवाडच्या हायड्रोपॉवर प्रकल्पात भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मलिक यांच्यासह सातजणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यांनी स्वतŠ एक्स पोस्टमधून याबाबतची माहिती दिली आहे.
चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे एम एस बाबू, एम के मित्तल आणि अरुण कुमार मिश्रा, सचिव विरेंद्र रामा आणि कनवर सिंह राणा आणि कवलजित सिंह दुग्गल या सहाजणांचे नाव आरोपपत्रात आहे. किरू हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रकल्पाशी निगडित कामांत 2,200 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत 2024 मध्ये सीबीआयने दिल्ली आणि जम्मूतील आठ ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. दरम्यान, हितचिंतकांना नमस्कार, मी फोन कॉल घेण्यास असमर्थ आहे. प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे कुणाशी बोलण्याच्या मनŠस्थितीत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.