सीबीआयच्या कस्टडीतून 103 किलो सोने गायब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
gold

देशातील मोठमोठय़ा गुह्यांचा छडा लावणाऱया सीबीआयच्या कस्टडीतून 103 किलो सोने गायब झाले आहे. या सोन्याची किंमत तब्बल 45 कोटी होती. न्यायालयाने या प्रकरणात तामीळनाडू सीआयडीला चौकशीचे आदेश दिले आहेत.

चेन्नईमधील सुराना कॉर्पेरेशन लिमिटेडच्या ऑफिसवर छापा टापून सीबीआयच्या टीमने 400.5 किलोग्रॅम सोने जप्त केले होते. या कारवाईत सोन्याच्या विटा आणि दागिन्यांच्या स्वरूपात जप्त करण्यात आलेला सर्व मुद्देमाल सीबीआयच्या कस्टडीमध्ये ठेवण्यात आला होता. यामधील तब्बल 103 किलोग्रॅम सोने गहाळ झाल्याचे उघडकीस आले आहे.