राकेश अस्थाना लाच प्रकरण; चौकशी पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांची मुदतवाढ

361
rakesh-asthana
फाईल फोटो

सीबीआयचे माजी विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यावरील लाच प्रकरणाची चौकशी पूर्ण करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने आज सीबीआयला आणखी दोन महिन्यांचा वेळ वाढवून दिला.

या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच अमेरिका आणि संयुक्त राष्ट्र अमिरातीला ‘लेटर्स ऑफ रोगेटरी’ पाठवून या दोन्ही देशांकडून न्यायालयीन मदत मागविण्यात आली आहे. त्यावरील उत्तर अजून प्राप्त झालेले नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊ शकलेला नाही, अशी माहिती अतिरिक्त सॉलिसिटर जनरल विक्रमजीत बॅनर्जी यांनी न्यायमूर्तींना दिली आणि मुदतवाढ मागितली.

आपली प्रतिक्रिया द्या