
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) आज बारावीचा निकाल जाहीर केला. यावर्षी उत्तीर्णतेचे प्रमाण 85.20 टक्के इतके नोंदवण्यात आले आहे. गेल्या वर्षी सीबीएसईचा निकाल 88.39 टक्के इतका लागला होता. त्या तुलनेत निकालामध्ये यंदा 3.19 टक्क्यांची घसरण झाली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली.
सीबीएसई बारावी परीक्षेसाठी 17 लाख 68 हजार 968 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 15 लाख 7 हजार 109 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये यंदाही मुलींनी बाजी मारली असून त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 88.86 टक्के इतके आहे. तर मुलांचे प्रमाण 82.13 टक्के इतके आहे. यात त्रिवेंद्रम (तिरुअनंतपुरम) विभागाने 95.62 टक्के मिळवत देशात पहिला क्रमांक पटकावला. तर प्रयागराजचा निकाल सर्वात कमी म्हणजेच 72.43 टक्के इतका आला आहे.
उरणच्या सई भोईरने मिळवले 92.20 टक्के
उरणच्या सई सतीश भोईर हिने बारावीच्या सीबीएसई बोर्ड परीक्षेत 500 पैकी 476 गुण मिळवत 95.20 टक्के मिळवले. सई ही नवी मुंबई, सीवूड येथील दिल्ली पब्लिक स्पूलची विद्यार्थिनी आहे. तिच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापनाने व शिवसेनेचे माजी आमदार, जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांनी विशेष काwतुक केले आहे. पुण्यातील एमआयटीमध्ये प्रवेश घेऊन पुढील शिक्षण घेण्याचा तिचा मानस आहे.


























































