
सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या प्रथम सत्र परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. ऑनलाइन पद्धतीने हा निकाल लागणार असून विद्यार्थ्यांना कॉम्प्युटराईज गुणपत्रिका दिली जाणार आहे. त्यात विषयनिहाय गुण विद्यार्थ्यांना पाहता येतील. प्रथम सत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या सत्र परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. सीबीएसईकडून उत्तरपत्रिकांचे ओएमआर स्पॅनिंग केले जात असून निकालाच्या अधिकृत तारखेची घोषणा अद्याप बोर्डाने केलेली नाही. कोरोना संसर्गाच्या परिस्थितीवर निकाल कधी जाहीर होईल याचे चित्र स्पष्ट होईल, असे सीबीएसईच्या वतीने सांगण्यात आले.





























































