पुणे- सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर चिखल लावून एटीएम मशीनची तोडफोड, एकाला अटक

355

पुणे येथे एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर चिखल लावून मशीन उचकटण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला हडपसर पोलिसांनी अटक केले. ही घटना शनिवारी मांजरी परिसरातील घुले शाळेजवळ घडली. राहूल माणिक तुपेरे (वय 30, रा. कुंजीरवस्ती, मांजरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई आकाश गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई आकाश गायकवाड आणि कांबळे काल मांजरी परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी मुंबईतील एचडीएफसी बँकेने मांजरी परिसरातील त्यांच्या बँकेच्या एटीएम मशीनची छेडछाड झाल्याची माहिती हडपसर पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस शिपाई गायकवाड आणि कांबळे घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी राहूल एटीएम मशीनचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. याप्रकरणी पोलीस हवालदार लोखंडे तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या