पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; एक जवान शहीद

373

जम्मू कश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानकडून अजूनही शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच आहे. पाकिस्तानने बारामुल्लातील उरी सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधीचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे. हिंदुस्थानी सुरक्षा दलाकडून या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना वाढत आहेत. पाकिस्तानकडून हिंदुस्थानी लष्कराच्या चौक्या आणि नागरी भागांना लक्ष्य करण्यात येत आहे. हिंदुस्थानी लष्करी अधिकाऱ्यांनी पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांना भेटून नागरी भागावर करण्यात येणाऱ्या गोळीबाराचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. पल्लनवाल सेक्टरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत नागरिकांना लक्ष्य केले होते. दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी, यासाठी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार करण्यात येतो. मात्र, सुरक्षा दल सतर्क असल्याने दहशतवाद्यांचे घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यात येत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या