
पाच मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याची घोषणा केल्यानंतर सीएट लिमिटेडने आता महाराष्ट्रात पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल 60 लाख रुपये खर्चून हा प्रकल्प उभारला जाणार आहे. येथे तयार होणारी वीज कंपनीच्या भांडुप आणि नाशिक येथील प्रकल्पात वापरली जाणार आहे. सीएट लिमिटेड या टायरनिर्मिती करणाऱ्या कंपनीने अपारंपरिक ऊर्जा वापरला प्राधान्य दिले आहे. त्यानुसार पवन ऊर्जा प्रकल्प उभारणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. दरम्यान, कंपनी आपल्या एकूण वीज वापराच्या जवळपास 25 टक्के वीज अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पातून घेत असल्याचे सीएट लिमिटेडने स्पष्ट केले आहे. तसेच पुढील तीन वर्षांत एकूण वीज वापराच्या तब्बल 50 टक्के वीज अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पातून घेण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे सीएट लिमिटेडने स्पष्ट केले आहे.























































