शिवसैनिकांचा मेळावा उत्साहात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । वसई

पालघरसह वसई व नालासोपाऱ्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. कांग्रेस व बहुजन विकास आघाडीला यामुळे मोठा झटका बसला असून आगामी निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत विधानसभेवर भगवा फडकवण्याचा निर्धार करण्यात आला. अनेक मुस्लिमबांधवांनीही भगवा खांद्यावर घेतल्याने विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

बोईसरजवळील पेल्हार-गांगडेपाडा येथील मुस्लिमबहुल भागात शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले. पालघर जिल्हा संपर्कप्रमुख व आमदार रवींद्र फाटक यांनी शिवसेनेत प्रवेश केलेल्याचे भगवा झेंडा देऊन स्वागत केले. यानिमित्ताने शिवसैनिकांचा मोठा मेळावा घेण्यात आला. यावेळी नालासोपारा काँग्रेसचे उपाध्यक्ष उत्तम तावडे व बहुजन विकास आघाडीचे इरशाद शेख, सलाउद्दीन अन्सारी यांच्यासह प्रा. उर्मिला कानिटकर, ऍड. सुशिला पिंपळे आदींनी शिवसेनेत प्रवेश केला.

या कार्यक्रमास शिवसेना पालघर लोकसभा संघटक श्रीनिवास वनगा, समन्वयक प्रभाकर राऊळ, जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, कोकण पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी, माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, महिला आघाडीच्या भारती गावकर, मौलाना खुर्शिद निजामी, विधानसभा संघटक विनायक निकम, जितेंद्र शिंदे, श्रद्धा राणे आदी उपस्थित होते.