
आयपीएलच्या फटकेबाजीला काहीसा ब्रेक लागला असला तरी येत्या 23 ते 25 मेदरम्यान मरीन लाईन्सच्या मुंबई पोलीस जिमखान्यावर मराठी सेलिब्रिटी लीग रंगणार आहे. यात अभिनय, नाटय़, संगीत, दिग्दर्शन, तंत्रज्ञ अशा विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी आपल्यातील जोरदार खेळाचे दर्शन घडवतील. सेलिब्रिटी कलावंतांना एक विरंगुळा आणि आत्मिक समाधान म्हणून थ्री स्टार मीडिया सोल्युशन लिमिटेडने या तीनदिवसीय लीगचे धमाकेदार आयोजन केले आहे.
या लीगमध्ये प्रसिद्ध नामवंत असे दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आणि त्यांचे संघ सहभागी होणार आहेत. यात प्रामुख्याने संजय जाधव, प्रवीण तरडे, सिद्धार्थ जाधव, संचित यादव, हरीश दुधाडे, हार्दिक जोशी यांचा सहभाग असेल. या स्पर्धेचे आयोजन संचित यादव, पूर्णिमा वाव्हळ , विनायक धारगळकर, अजय सूर्यवंशी, सचिन खंडांगळे, रोशनी सावंत, सौरभ राजपुरे, पॅल्विना चॅटर्जी यांनी केले आहे. सेलिब्रिटी कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी मायबाप प्रेक्षकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन संचित यादव आणि पूर्णिमा वाव्हळ यांनी केले आहे.