लॉकडाऊन वाढवण्याची राज्य सरकारांची विनंती, केंद्र सरकारकडून विचार

4902

कोरोनाचे संकट पाहता देशात 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. अनेक राज्य सरकारांनी लॉकडाऊनचा कार्यकाळ वाढवा अशी विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. केंद्र सरकारही या बाबत विचार करत आहे.

हिंदुस्थानात कोरोनाचे 4 हजार 421 रुग्ण आढळले आहेत. तर 114 जणांचा मृत्यू झाला आहे. तीन राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 500 च्या वर आहे. देशातील 31 राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, छ्त्तीसगड, आसाम आणि झारखंड या राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत. तर तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेकर राव यांनी पंतप्रधान मोदींना लॉकडाऊन वाढवण्ह्याचई विनंती केली आहे. तेलंगाणात जूनपर्यंत लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. परंतु अनेक राज्यांत कोरोनाचा आकडा वाढतच आहे. सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात 748 कोरोनाचे रुग्ण आढळले असून तमिळनाडूत 621 रुग्ण आढळले आहे. तर तिसर्‍या क्रमांकावर दिल्ली असून तिथे 523 रुग्ण आढळले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या