फुटिरतावाद्यांना मोठा धक्का, यासिन मलिकच्या संघटनेवर बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जम्मू कश्मीरमधील फुटिरतावादी यासिन मलिकच्या जम्मू कश्मीर लिबरेशन फ्रंट या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी म्हणजे कश्मीर खोऱ्यातील फुटिरतावाद्यांना केंद्र सरकारकडून मोठा धक्काच मानले जात आहे.

यासिन मलिकची जम्मू कश्मीर लिबरेशन फ्रंट ही संघटना 1988 पासून कश्मीर खोऱ्य़ात फुटिरतावादी विचार  व हिंसाचार पसरवत आहे. त्यामुळे सरकारने दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत या संघटनेवर बंदी घातली आहे. सरकारचा हा निर्णय म्हणजे दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसीचाच एक भाग आहे, असे केंद्रीय गृह सचिव राजीव गौबा यांनी सांगितले.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने फुटिरतावाद्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती. तसेच टेरर फंडिंग प्रकरणी आतापर्यंत सात फुटिरतावाद्यांच्या संपत्तीवर अंमलबजावणी संचलनालयाने टाच आणली आहे.