50 टक्के कर्मचाऱ्यांना वर्षभर घरातून काम करता येणार, वर्क फ्रॉम होमसाठी केंद्राचा नवा नियम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना काळात अनुभवलेल्या वर्क फ्रॉम होमची कामाची पद्धत आता आयटी आणि आयटीशी संबंधित विशेष आर्थिक क्षेत्रातील 50 टक्के कर्मचाऱ्यांसाठी वर्षभर राबवता येणार आहे. वर्क फ्रॉम होम कार्यपद्धतीत सुटसुटीतपणा, सूसूत्रता आणण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य खात्याने नव्या धोरणानुसार 43ए हा नियम लागू केला आहे.

हिंदुस्थानातील आयटी आणि आयटीशी संबंधित विशेष आर्थिक क्षेत्राने वर्क फ्रॉम होमसाठी एकच नियम असणारे धोरण तयार करा, अशी विनंती केंद्रीय वाणिज्य खात्याला केली होती. त्या पार्श्वभूमीवर, आढावा घेऊन वर्क फ्रॉर्म होममध्ये सूसूत्रता आणण्यासाठी 43-ए हा नियम बनवण्यात आला आहे. आयटी आणि आयटीशी संबंधित विशेष आर्थिक क्षेत्र म्हणून दर्जा मिळालेले क्षेत्र, त्या क्षेत्रातील सतत फिरतीवर असणार्या, काही कारणांमुळे ऑफिसला येणे शक्य नसलेल्या आणि कायम कर्मचा-यांबरोबर कंत्राटी कर्मचा-यांना वर्क फ्रॉम होमचा लाभ घेणे शक्य होणार आहे.

काय आहे हा नवा नियम

1) नव्या नियमाप्रमाणे कर्मचार्याला जास्तीत जास्त एक वर्ष घरातून काम करणे शक्य होणार आहे.
2) कंपनी आपल्या 50 टक्के कर्मचार्यांना वर्क फ्रॉम होमची सुट देऊ शकते.
3) आयटी आणि आयटीशी संबंधित सतत फिरतीवर असणाऱ्या, काही कारणांमुळे ऑफिसला येणे शक्य नसलेल्या आणि कायम कर्मचा-यांबरोबर कंत्राटी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा लाभ घेणे शक्य होणार आहे.
4) होम फ्रॉम होममध्ये एक वर्ष घरातून काम करता येणार आहे. मात्र, विकास आयुक्तांची विशेष परवानगी घेऊन त्यात आणखी एक वर्ष वाढ करता येणार आहे.
5) जे कर्मचारी आधीपासून वर्क फ्रॉम होम करत आहेत त्यांना 90 दिवसांची आजारपणाची सुट्टी घेता येणार आहे.
6) वर्क फ्रॉम होमसाठी कर्मचाऱ्याला आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा पुरवण्याचे काम हे कंपनीचे असणार आहे.
7) विकास आयुक्तांकडून लिखित परवानगी घेऊन 50 टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली जाऊ शकते.