मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । ठाणे

वासिंद आणि खडवली दरम्यान एका गायीला अपघात झाल्याने कसारा ते टिटवाळा दरम्यान सीएसटीएमच्या दिशेने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. गायीला अपघात झाल्यानंतर तिचा मृतदेह इंजिनमध्ये अडकला. त्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली. आज सकाळी अंबरनाथ-बदलापूर दरम्यान हैदराबाद एक्सप्रेसच्या इंजिनामध्ये बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे कर्जत ते अंबरनाथ वाहतूक ठप्प झाली होती. आता पुन्हा रेल्वे विस्कळीत झाल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप होत आहे.