
मध्य रेल्वे मार्गावरील अनेक ऐतिहासिक आणि देखण्या स्थानकांनी बॉलीवूडला भुरळ घातली असून याचा सकारात्मक परिणाम रेल्वेच्या महसुलावर झाला आहे. तीन वर्षांत रेल्वेच्या तिजोरीत 2.29 कोटी रुपयांच्या महसुलाची भर पडली आहे. ‘युनेस्को’चे जागतिक वारसा स्थळ असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस चित्रीकरणासाठी सर्वाधिक पसंतीच्या ठिकाणांपैकी एक आहे. या देखण्या वास्तूच्या आवारात ‘स्लमडॉग मिलेनिअर’ (गाणे-जय हो), ‘रब ने बना दी जोडी’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘स्टोनमॅन’, ‘डर’, ‘द लंच बॉक्स’, ‘द ट्रेन’ यांसारखे लोकप्रिय चित्रपट आणि आयपीएल, सनफिस्ट इत्यादींसह अनेक टीव्ही जाहिरातींचे चित्रीकरण झाले आहे.
























































