
पावसाळा संपल्यानंतर देखील मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार कमी झालेले नाहीत. सोमवारी दुपारी कल्याण-कसारा डाऊन मार्गावरील वाहतूक अर्धातासासाठी विस्कळीत झाली होती. ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक ठप्प झाल्याने अनेक गाड्या खोळंबल्या होत्या. तर कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या काही लोकल कल्याणनंतर पुन्हा सीएसएमटीच्या दिशेने फिरवण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या खोळंब्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत.
दरम्यान, अर्धातासाच्या दुरुस्ती कामानंतर ही वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र वेळापत्रकानुसार वाहतूक होण्या करता आणखी काही काळ लागेल असे सांगण्यात येत आहे.

























































