मध्य रेल्वेचा निळा सुरक्षा दिवा आजपासून सेवेत!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

उपनगरीय रेल्वेमार्गावर दररोज सरासरी दहा प्रवाशांचा हकनाक बळी जातो. त्यात चालती गाडी पकडताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही मोठे असते. त्यामुळे लोकलच्या दारात निळा सुरक्षा दिवा बसविण्याचे काम मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आले होते.

आता अशी दरवाजातील निळ्या सुरक्षा दिव्याची संपूर्ण लोकल शुक्रवारपासून धावणार आहे. गाडी सुटण्यापूर्वी दरवाजात बसविण्यात आलेल्या निळ्या दिव्याची सूचना प्रवाशांना मिळणार आहे. त्यामुळे गाडीतून पडून होणाऱ्या अपघातांना आळा बसणार आहे.