रेल्वे रुळाला तडे, मध्य रेल्वे उशिराने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

सामना ऑनलाईन । कल्याण

मध्य रेल्वेच्या कल्याण-विठ्ठलवाडी स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या गाड्या 15-20 मिनिटे उशिराने धावत आहेत. तर काही गाड्या मध्य रेल्वेकडून रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे.