मध्य रेल्वेवर लोकल 15 ते 30 मिनिटांनी उशिराने, कारण अस्पष्ट

मध्य रेल्वेवर गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

ठाणे स्थानकावरून सीएसएमटीपर्यंत गाड्या तब्बल 15 ते 30 मिनिटांनी धावत आहेत. ठाणे स्थानकावरून जलद गाड्या 15 मिनिटाने उशिराने धावत असल्याची उद्घोषणा होत होती. असे असले तरी गाड्या उशिराने का धावत आहेत याचे कारण कळालेले नाही.