
मध्य रेल्वेची वाहतूक ऐन गर्दीच्या वेळी ठप्प झाली होती. बदलापूर स्थानकापूर्वी लातूर-मुंबई मेलचे इंजिन बंद पडले होते. अंबरनाथ आणि बदलापूर स्थनकाच्यामध्येच हे इंजिन बंद पडले ज्यामुळे बदलापूर-मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. लातूर मेलच्या इंजिनातील अनेक लोकल गाड्या या सकाळी सात वाजल्यापासून बदलापूर स्थानकात खोळंबल्या होत्या. कामावर जाण्यासाठी निघालेल्या नागरिकांची लोकल वाहतूक ठप्प झाल्याने मोठी गैरसोय झाली होती.
Train 22108 Latur to CSMT has stopped between Badlapur – Ambernath section due to trouble in engine. Time 7.05am onwards.
Trains running from Karjat/Badlapur/Ambernath towards Kalyan/CSMT side are likely to be affected. All efforts are being taken to solve the problem.— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) March 30, 2022
मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्विट करत बिघाड दुरुस्त झाला असून लातूर मेल पुन्हा मार्गस्थ झाल्याचं सांगितलं आहे. याशिवाय 7.50 च्या सुमारास वाहतूक पूर्ववत झाली असल्याचंही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Problem resolved. Train 22108 re-started at 7.50am. Traffic re-stored.
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) March 30, 2022





























































