
मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 04 आणि 05/11/2023 (शनिवार/रविवार रात्री) रोजी 00.35 ते 04.35 यावेळेत माटुंगा आणि भायखळा दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे उपनगरीय आणि मेल/एक्स्प्रेस गाड्या वळवण्यात आल्या आहेत.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे येणार्या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या माटुंगा ते भायखळा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि दादर येथे प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर दुहेरी थांबा देण्यात येईल. याकाळात नियोजित आगमनापासून 10 ते 15 मिनिटे उशीराने गाड्या धावणार आहेत. ब्लॉक कालावधीत डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या माटुंगा ते भायखळा दरम्यान डाऊन स्लो मार्गावर वळवण्यात येतील आणि दादर येथे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर दुहेरी थांबा देण्यात येईल आणि इगतपुरी, लोणावळा आणि रोहा येथे त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा 10 ते 15 मिनिटे उशीराने पाहचतील.
हार्बर मार्गावरील ब्लॉक
हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप आणि डाउन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून पनवेल/बेलापूरसाठी आणि पनवेल/ बेलापूरहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप आणि डाऊन मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-कुर्ला स्थानकांदरम्यान विशेष उपनगरीय गाड्या धावणार आहेत. तसेच ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत उपलब्ध असतील.



























































