भायखळ्याची हेरिटेज प्रिंटिंग प्रेस बंद पाडू देणार नाही, रेल कामगार सेनेचा मध्य रेल्वेला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भायखळ्याच्या शंभर वर्षे जुन्या ब्रिटीशकालिन प्रिटिंग प्रेसला बंद पाडून येथील मोक्याच्या जागेचे खाजगीकरण करण्याचा घाट मध्य रेल्वे प्रशासनाने घातला आहे. यासंदर्भात रेल कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेचे भांडार नियंत्रक विभागाचे प्रमुख व मुख्य सामुग्री प्रबंधक आदित्य शर्मा यांची भेट घेऊन याप्रकरणी तीव्र शब्दात निषेध केला आहे.

मध्य रेल्वेची भायखळा येथील प्रिटिंग प्रेस डिसेंबर 2020 मध्ये बंद करण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातला आहे. रेल कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्या नेतृत्वाखाली रेल कामगार सेनेचे सरचिटणीस दिवाकर देव, कार्याध्यक्ष संजय जोशी यांनी मुख्य सामुग्री प्रबंधक आदित्य शर्मा यांची भेट घेतली. तसेच ही प्रिटिंग प्रेस बंद करू नये अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी सचिव उमेश नाईक, बी.बी.शर्मा, विलास परब, विजय शिरोडकर, दिलीप पाटील, स्वप्नील झेमसे आदी उपस्थित होते.

प्रिटिंग प्रेस बंद केल्यास बेरोजगारीचे संकट
मेन्टेनन्स आणि रनिंग स्टाफची 32 सेफ्टी आयटम येथे छापले जातात. विविध प्रकारच्या टिकीट्स, मनी रिसिप्ट छापल्या जातात. महालक्ष्मी येथील प्रिटिंग बंद करून तेथील कामगारांना येथे समाविष्ठ केले आहे. खासदार अडसूळ यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेमंत्र्याशी झालेल्या चर्चेनंतर येथे उत्तम दर्जाच्या विविध मशिन्स विकत घेतलेल्या आहेत.कर्मचाNयांना स्पेनमध्ये ट्रेनिंग देऊन प्रिटिंग मशिन्स उत्तमरित्या वापरल्या जात आहेत. 2022 पर्यंतची छपाई करून येथे स्टॉक करण्यात आला आहे. ही प्रिटिंग प्रेस बंद करणे म्हणजे भरतीवर मोठा परिणाम होऊन बेरोजगारीला आमंत्रण ठरण्याची दाट शक्यता असल्याचे सरचिटणीस दिवाकर देव यांनी म्हटले आहे.