‘मरे’च्या डाऊन लोकलमध्ये बिघाड, धिमी लोकल जलद मार्गावर वळवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । मुंबई

मध्य रेल्वेच्या प्रवाशांना गुरुवारी पुन्हा एकदा तांत्रिक बिघाडाचा फटका बसला आहे. दादर-माटुंगादरम्यान डाऊन दिशेच्या धिम्या लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली आहे. त्यामुळे डाऊन दिशेच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले.