
मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सीएसएमटी स्थानकावर सर्व लोकल ट्रेन उभ्या असून कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे वाहतूक कोलमडली आहे. त्यामुळे घरी जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. मुंब्रा रेल्वे अपघातप्रकरणी रेल्वेच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याच्या मुद्द्यावर रेल कामगार सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. रेल्वेच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनवू नका, कर्मचाऱ्यांवरील अन्यायकारक कारवाई खपवून घेणार नाही. कर्मचाऱ्यांविरोधातील संबंधित गुन्हे तातडीने मागे घ्या अशी मागणी रेल कागार सेनेने घेतली आहे.
फोटो – मंगेश मोरे






























































