मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांचे हाल

1214
local-mumbai

मध्य रेल्वेने मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ठाकुर्ली-डोंबिवली या रेल्वे स्थानकांदरम्यान पाटणा एक्सप्रेसचं इंजिन बंद पडलं आहे. त्यामुळे कल्याणहून मुंबईच्या दिशेने येणारी अप जलद मार्गाची वाहतूक खोळंबली आहे. यामुळे प्रवाशांचे मात्र मोठ्या प्रमाणावर हाल सुरू आहेत.

11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून अप जलद मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. यामुळे अप जलद मार्गावरील गाड्यांची वाहतूक आता अप धिम्या मार्गावर वळवण्यात आली आहे. दरम्यान, कल्याण कारशेडमधून अतिरिक्त इंजिन मागवण्यात आले असून त्याच्या मदतीने पाटणा एक्सप्रेस हटवण्यात येईल आणि त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात येईल.

आपली प्रतिक्रिया द्या