
असा तत्पर चौकीदार मिळायला नशीब लागतं असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. इतकंच नाही तर दोन महिन्यांनी येणाऱया केंद्रीय पथकावरही त्यांनी टीका केली आहे.
महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन महिने सहा दिवसांनी केंद्रीय पथक आले आहे. आता शिवारात जाऊन ते काय बघणार? शेतकऱ्यांनी खासगी सावकाराकडून पैसे घेऊन जमिनीची साफसफाई करुन हरभरा, ज्वारीची पेरणी केली आहे. या पिकाकडे बघून पथक म्हणेल, फसल तो बहुत अच्छी है इनको मदत करनेकी जरुरत नही, असे म्हणत राजू शेट्टींनी केंद्रीय पथकावरही टीका केली. अतिवृष्टीमुळे शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. त्यावेळी राज्य सरकारने केंद्राकडे परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पथक पाठवण्यासंदर्भात विचारणा केली होती. मात्र केंद्राकडून पथक आले नाही. यानंतर दोन महिन्यांनी आता नुकसानीची पाहणी करण्यासाठी पथक आलं आहे. त्यावरुन राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय पथकावर टीका केली आहे.
































































