केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे. आठवले यांना कोणतीही लक्षणे दिसत नसून खबरदारी म्हणून ते 4 दिवस खासगी रुग्णालयात दाखल होणार आहेत. आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी असं आवाहन करत आठवले माझी तब्येत ठणठणीत असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात लैंगिक छळवणुकीची तक्रार केल्यामुळे चर्चेत असलेली बॉलीवूड अभिनेत्री पायल घोष हिने राजकारणात एण्ट्री केली आहे. सोमवारी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत पायल घोष हिने आरपीआयमध्ये प्रवेश केला.

खासदार सुनील तटकरेही कोरोना पॉझिटिव्ह

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त आहे. तटकरे यांनीच त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे.

‘काल माझी करोना चाचणी करण्यात आली असून, आज त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील इस्पितळात दाखल झालो आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन.’ असं ट्वीट त्यांनी केलं आहे.