
सामना प्रतिनिधी । बुलढाणा
केंद्रीय पथक उद्या ५ डिसेंबर २०१८ रोजी जिल्हा दौर्यावर येत आहे. या दौर्यादरम्यान पथक जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार आहे. पथकामध्ये निती आयोगाचे संयुक्त सल्लागार मानश चौधरी, केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाचे वरिष्ठ सल्लागार एस. सी. शर्मा यांचा समावेश आहे.
त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : दि. ५ डिसेंबर २०१८ रोजी दुपारी २.३० वाजता जालना येथून प्रयाण, दुपारी ३ वाजता चिंचोली जहांगीर ता. सिंदखेड राजा येथे आगमन व दुष्काळी परिस्थिती पाहणी, दुपारी ३.३० वाजता चिंचोली जहांगीर येथून देवानगर ता. लोणारकडे प्रयाण, दुपारी ४.१५ वाजता देवानगर, ता. लोणार येथे आगमन व दुष्काळी परिस्थिती पाहणी, सायंकाळी ५ वाजता देवानगर ता. लोणार येथून अजिसपूर ता. लोणारकडे प्रयाण, सायंकाळी ५.३० वाजता अजिसपूर येथे आगमन व दुष्काळी परिस्थिती पाहणी, सायंकाळी ६ वाजता अजिसपूर ता. लोणार येथून जालनाकडे प्रयाण करतील.

























































