सेंट्रल विस्टा प्रकल्पाचा खर्च 282 कोटींनी वाढला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संसदेच्या नवीन वास्तू उभारणीसाठी केंद्रातील मोदी सरकारने हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल विस्टा प्रकल्पावरील खर्च तब्बल 29 टक्क्यांनी वाढला आहे. या प्रकल्पावरील खर्चापोटी अर्थसंकल्पामध्ये 977 कोटींची तरतूद करण्यात आली होती. तथापि, प्रकल्पावर आणखी 282 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामुळे एकूण खर्चाचा आकडा 1250 कोटींवर जाणार आहे.

टाटा प्रोजेक्ट्स ग्रुपमार्फत सेंट्रल विस्टा प्रकल्पाचे काम सुरू आहे. डिसेंबर 2020 मध्ये भूमिपूजन करण्यात आलेल्या या प्रकल्पाचे जवळपास 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. 13 एकरहून अधिक क्षेत्रावर उभारल्या जात असलेल्या चारमजली वास्तूचे काम यंदा देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले होते, मात्र नंतर याप्र प्रकल्पासाठी ऑक्टोबरची डेडलाइन निश्चित करण्यात आली होती. बांधकाम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी इतर बांधकाम प्रकल्पांप्रमाणे कोरोनाचे कुठलेही निर्बंध लागू करण्यात आलेले नाहीत. असे असतानाही प्रकल्पावर आणखी 282 कोटी रुपये खर्च करावा लागणार आहे.