
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
केंद्र सरकारने अल्पबचत खात्यांतील गुंतवणुकीवरील व्याजदरात ०.४ टक्के अशी भरघोस वाढ केली आहे. या निर्णयामुळे पीपीएफ, एनएससी(राष्ट्रीय बचत पत्र) आणि किसान विकास पत्रांत गुंतवणूक करणारे छोटे गुंतवणूकदार आणि नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) खात्यांना ८.० टक्के इतका व्याजदर दिला जाणार आहे. नवे सुधारीत व्याज दर १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१८ या तिमाहीसाठी लागू राहतील असे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जाहीर केले आहे.
नव्या व्याजदर वाढीचा लाभ ५ वर्षीय टीडी, रिकरींग डिपॉसिट्स आणि सिनियर सिटीझन सेव्हिन्ग स्कीम यांनाही मिळणार आहे. त्यामुळे पाच वर्षीय टीडीला ७.८ टक्के, आरडीला ७.३ टक्के तर सिनियर सिटीझन सेव्हिन्गला ८.७ टक्के व्याज मिळणार आहे. किसान विकास पत्र (केव्हीपी) आता ७.७ टक्के व्याज मिळून ११८ महिन्यांऐवजी ११२ महिन्यांतच मॅच्युअर्ड होईल. सुकन्या समृद्धी खात्यांना ८.५ टक्के तर बचत खात्यांना ४ टक्के व्याज दर मिळणार आहे.
असे असतील नवे व्याजदर
योजना नवे व्याजदर व्याजनिश्चिती कालावधी
बचत खाते ४.० टक्के वार्षिक
१ वर्षीय टीडी ६.९ तिमाही
२ वर्षीय टीडी ७.० तिमाही
३ वर्षीय टीडी ७.२ तिमाही
५ वर्षीय टीडी ७.८ तिमाही
५ वर्षीय आवर्ती ठेव (आरडी) ७.३ तिमाही
५ वर्षीय जेष्ठ नागरिक बचत ८.७ तिमाही
५ वर्षीय एमआयएस ७.७ मासिक
५ वर्षीय एनएससी ८.० वार्षिक
सार्वजनिक भविष्य निर्वाह
निधी ( पीपीएफ ) ८.० वार्षिक
किसान विकास पत्र ७.७ (आता ११८ महिन्यांऐवजी ११२ महिन्यात मॅच्युअर्ड होणार )
सुकन्या समृद्धी खाते ८.५ वार्षिक
summary-centre-raises-interest-rates-on-small-saving-schemes





























































