होऊ दे व्हायरल!!

14

प्रेक्षकांचे  प्रेम आणि उत्तम प्रतिसादाने ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने 400 भागांचा यशस्वी पल्ला गाठला. आता या कार्यक्रमातील विनोदवीर नवीन काय हस्यकल्लोळ घेऊन येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. यासाठी या नव्या पर्वात ‘होऊ दे वायरल’ या नवीन पर्वाची घोषणा करण्यात आली आहे. या पर्वात चक्क सर्वसामान्य प्रेक्षकही सहभागी होऊ शकतात. यासाठी महाराष्ट्रातील अनेक शहरात ऑडिशन्स घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे ‘चला हवा येऊ द्या’च्या कुटुंबात आता नवीन सदस्यांची भर पडणार आहे. त्यामुळे दर सोमवारी आणि मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता हा कार्यक्रम झी मराठीवर पाहायला आणखी मजा येईल.

आपली प्रतिक्रिया द्या