
चंदनाच्या झाडाची तस्करी दोघांना करण्यासाठी आलेल्या दोघांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केले. त्यांच्याकडून मोबाईल, दुचाकी, रोकड, 22 किलो वजनाची चंदनाची लाकडे असा 2 लाख 20 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.
रामदास शहाजी माने (वय 25 रा. मुर्टी, ता. बारामती), राजू बाबू शिंदे (वय 30, रा.दापोडी, दौंड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर चंदनाची लाकडे विकत घेणारा रमेश बाबू करडे (रा.दापोडी, ता.दौंड) याने पळ काढला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट पथकासह यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर होते. त्यावेळी दापोडीतील देशमुख वस्ती येथे दोघेजण रमेश करडेला चंदनाची लाकडे विक्री करणेसाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून रामदास आणि राजूला ताब्यात घेतले. तर रमेश पळून गेला. त्यांच्याकडून दुचाकी, रोकड, 22 किलो वजनाची चंदनाची लाकडे असा 2 लाख 30 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कामगिरी पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली महेश गायकवाड, निलेश कदम, सुभाष राऊत, गुरू गायकवाड यांच्या पथकाने केली.























































