
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील मुरमाडी जवळील कोटा या गावात एका घरात बिबट्या शिरल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती होताच वनविभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले.
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील मुरमाडी जवळील कोटा या गावात एका घरात बिबट्या शिरल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाचे कर्मचारी व पोलीस बिबट्याला घरातून बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. pic.twitter.com/evvRc9BGFP
— Saamana (@SaamanaOnline) February 26, 2023
गावातील नागरिकांनी बिबट्या पाहण्याकरिता झुंबड उडालेली आहे. सिंदेवाही तालुक्यात वन्य प्राण्यांचा हल्ला, मृत्यू व परिसरात नेहमीच जंगलातील प्राण्यांचा वावर दिसून येत आहे. बिबट्याला घरातून काढण्याचे वन कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.



























































