नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नातवाला भाजपने पदावरून दूर केले

2114

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रकुमार बोस यांना भाजपने उपाध्यक्ष पदावरून दूर केले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपने संघटनात्मक बदल केले आहेत. 2021 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे बदल करण्यात आले आहेत. या बदलांमध्ये चंद्रकुमार बोस यांना पदावरून दूर करण्यात आले आहेत. भाजपने पश्चिम बंगालच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी अभिनेत्री अग्निमित्रा पॉल यांनी निवड केली आहे, तर 12 जणांना उपाध्यक्षपदी नेमले आहे.

नागरिकत्त्व सुधारणा कायदा म्हणजेच CAA विरोधात चंद्रकुमार बोस यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली होती. त्यांची भूमिका ही सातत्याने पक्षविरोधी होती म्हणून त्यांना पदावरून दूर केलं असल्याची चर्चा आहे. चंद्रकुमार बोस यांनी पक्षाच्या धर्मनिरपेक्षतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. धर्मनिरपेक्षतेच्या मुद्दावर समाधान न झाल्यास भाजपत राहायचे अथवा नाही याबाबतही पुनर्विचार करण्याचे त्यांनी म्हटले होते.

भाजपने 12 नवे उपाध्यक्ष नेमले आहेत, यामध्ये बैरकपूरमधून खासदार अर्जुन सिंह, बांकुरा इथून खासदार सुभाष सरकार, देबाशिश मित्र, राजकमल पाठक, रितेश तिवारी यांचाही समावेश आहे. खासदार सौमित्र खान हे भाजपच्या युवामोर्चाचे अध्यक्ष बनले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या