पुणे जिल्हा वारकरी सेवा संघ, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती संयुक्त विद्यमाने चंद्रभागा स्वच्छता अभियान वारकरी सेवा संघाचे संस्थापक राजाभाऊ चोपदार यांच्या संकल्पनेतून जिल्हा अध्यक्ष ह.भ.प. संजय महाराज बोरगे यांच्या नेतृत्वात पुरंदर तालुक्यातील दोनशे सेवकांनी आनंद बाठे यांच्या सहकार्याने सेवा रूजू केली.
तीर्थक्षेत्री नद्या स्वच्छता अभियान उपक्रमांतर्गत दर महिन्याला प्रत्येक तालुक्यातील सुमारे दोनशे सेवक ही सेवा स्वखर्चाने येत रुजू केली जाते. हजारो भाविक व वारकरी दररोज श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. चंद्रभागेमधे स्नान करताना तीर्थ म्हणून पाणी प्राशन करतात. मात्र येथील नदीपात्रात खुप अस्वच्छता असल्यामुळे व फाटके कपडे, निर्माल्य, लोकांनी पाण्यात सोडलेले जुने ग्रंथ, देवांचे फोटो असे खुप साहित्य असते. हे चंद्रभागा वाळवंट स्वच्छ असावे ही पवित्र भावनामनात ठेवत इतर संस्थांनीही यापासून प्रेरणा घेऊन स्वच्छता करावी अशी अपेक्षा वारकरी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प.संजय महाराज बोरगे यांनी यावेळी व्यक्त केली .